आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज भारतीय हॉकी संघाची लागणार कसोटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्लासगो - दोन कच्च्या संघांना सहजपणे हरवल्याने फॉर्ममध्ये आल्यासारख्या भासणार्‍या भारतीय संघाची ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज होणार्‍या सामन्यात कसोटी लागणार आहे. भारत जगात नवव्या स्थानी, तर ऑस्ट्रेलिया हॉकीविश्वात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला कशी टक्कर देतो, ते पाहणे रंजक ठरणार आहे.

भारताने अ गटातील साखळी सामन्यांमध्ये यापूर्वी वेल्स व स्कॉटलंडला पराभूत केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सरदाराच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ कशी कामगिरी करतो त्यावर कामगिरीचे मूल्यमापन केले जाईल. सद्य:स्थितीत तरी ऑस्ट्रेलिया भारतापेक्षा अनेक पटींनी सरस वाटतो. मात्र, दोन्ही संघ जेव्हा मैदानावर उतरतील तेव्हा ते कशी कामगिरी करतात त्यातूनच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.