आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CWG: Indian Women Hockey Team Crushed T&T By 14 0, News In Marahti

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्‍या महिला हॉकी संघाने त्रिनिदादला-टोबॅगोला 14-0 ने दिली मात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्लासगो - 20 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या हॉकीमध्ये भारताने त्रिनिदाद-टोबॅगोचा 14-0 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला. भारतीय महिला हॉकी संघाने आपल्या तिसऱया सामन्यात प्रतिस्पर्धी त्रिनिदाद-टोबॅगोला एकही गोल नोंदवू दिला नाही.
रितु राणीच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला हॉकी संघाने राष्ट्रकुल स्पर्धेत धडाकेबाज विजयाची नोंद केली. भारताने स्पर्धेतील आपल्या तिसर्‍या सामन्यात त्रिनिदाद अँड टोबेगो महिलांचा 14-0 अशा फरकाने पराभव केला.
भारताकडून जसप्रीत कौर, राणी रामपाल आणि दीपिका ठाकूरने प्रत्येकी तीन गोल केले. तसेच वंदना कटारिया, अनुराधा थोकचोम, रितु राणी, अनुपा बरला व रितु आर्याने संघाच्या विजयात प्रत्येकी एका गोलचे योगदान दिले. भारतीय संघाने दमदार सुरुवात करताना पहिल्याच हाफमध्ये 9-0 ने आघाडी घेतली होती. त्यानंतर भारताने दुसर्‍या हाफमध्ये पाच गोलची कमाई केली.
पुढील स्‍लाइडवर पाहा , भारतीय महिला हॉकी संघाचे छायाचित्रे..