आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरदारा सिंग उपांत्य सामन्यातून बाहेर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्लासगो - राष्ट्रकुल स्पर्धेच्या हॉकीत भारतीय संघाचा उपांत्य सामना शनिवारी न्यूझीलंडशी होणार आहे. मात्र, या सामन्याला भारतीय संघाचा कर्णधार सरदारा सिंग मुकणार आहे. बुधवारी झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीतील गैरवर्तनप्रकरणी सरदारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. प्रतिस्पर्धी खेळाडूला टक्कर देऊन गंभीर जखमी केल्याप्रकरणी शिस्तपालन समितीने ही कारवाई केली आहे. या सामन्यादरम्यान त्याला यलो कार्ड दाखवून दहा मिनिटे मैदानाबाहेर बसवण्यात आले होते.
या रंगतदार लढतीत ऑस्ट्रेलियाने भारतावर 4-2 ने मात केली होती. दरम्यान, भारताला पराभवासह सरदारा सिंगवरच्या कारवाईमुळे दुहेरी फटका बसला. याशिवाय उपांत्य सामन्यापूर्वीच भारतीय संघ आता संकटात सापडला आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीतील उद्देशाने आता भारताला सरदाराच्या अनुपस्थितीत मैदानावर उतरावे लागणार आहे. या सामन्यातील विजयासह भारताचा अंतिम फेरीतील प्रवेशाचा मार्ग सोपा होणार आहे. मात्र, त्यासाठी मोठी संघाला मेहनत घ्यावी लागेल.