आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदक विजेत्या खेळाडूंच्या नशिबी राज्य शासनाची उपेक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राही सरनोबत, अनिसा सय्यद, अयोनिक पॉल, ओंकार ओतारी, आणि गणेश माळी यांनी स्कॉटलंडच्या भूमीवर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदके जिंकत महाराष्ट्राची शान अटकेपारही कायम ठेवली. इतर राज्यांतील पदक विजेत्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव होत असताना महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या पदरी मात्र उपेक्षा पडली आहे.

अद्याप राज्य शासनाकडून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंना कसलीही बक्षिसे जाहीर करण्यात आलेली नाहीत. खेळाडू, पालक, प्रशिक्षक बक्षिसांच्या प्रतीक्षेत आहेत.
राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांची कमाई करणार्‍या महाराष्ट्रातील खेळाडूंच्या कौतुकाबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांनी अद्याप कोणत्याही प्रकारची घोषणा केली नाही. मुख्यमंत्री चव्हाण यांनी खेळाडूंचे अभिनंदन मात्र केले आहे. असे असले तरीही खेळाडूंच्या कामगिरीबद्दल शासन दरबारी उदासीनता दिसून येते. खेळाडू, पालक तसेच क्रीडा विश्वात या सापत्न वागणुकीमुळे तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रातील पदक विजेते खेळाडू
पदक दिनांक खेळाडू ठिकाण प्रकार
कांस्य 25 जुलै गणेश माळी पुणे वेटलिफ्टिंग
सुवर्ण 26 जुलै राही सरनोबत कोल्हापूर नेमबाज
रौप्य 26 जुलै अयोनिका पॉल मुंबई नेमबाज
रौप्य 26 जुलै अनिसा सय्यद पुणे नेमबाज
कांस्य 27 जुलै ओंकार ओतारी कोल्हापूर वेटलिफ्टिंग
मणिपूर शासनाची आठ तासांत घोषणा
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणार्‍या संजिताला मणिपूर राज्य शासनाने अवघ्या आठ तासांत बक्षीस जाहीर केले. मणिपूरचे मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंग यांनी सुवर्णपदक विजेत्या संजिताला 15 लाखांचे बक्षीस दिले. तसेच रौप्यपदक विजेत्या मीराबाईला 10 आणि कल्पनाला 5 लाखांच्या बक्षिसांची घोषणा केली.
मुख्यमंत्री जाहीर करतील
राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंना बक्षीस देण्याची घोषणा मुख्यमंत्री करतील. त्यासाठी मी लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. पद्माकर वळवी, राज्य क्रीडामंत्री

छायाचित्र - राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पटकावणारी महाराष्ट्राची राही सरनोबत.