आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नायजेरियाची वेटलिफ्टर डोपिंगच्या चाचणीत दोषी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्लासगो - नायजेरियाची अवघी 16 वर्षांची वेटलिफ्टर चिका अमालाहा ही अमली पदार्थ चाचणीत दोषी आढळल्याने तिला राष्ट्रकुल स्पर्धेतून निलंबित करण्यात आले. विशेष म्हणजे तिने 53 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावल्यानंतर ही चाचणी घेण्यात आली होती. तिच्या चुकीचा फायदा भारताला झाला आहे. आता संतोषी मास्ताला रौप्यपदक तर स्वाती सिंगला कांस्यपदक मिळेल.
चिकाची 25 जुलैलादेखील चाचणी घेण्यात आली होेती. त्यातदेखील काही प्रतिबंधित घटक दिसल्याने पुन्हा 30 तारखेच्या स्पर्धेनंतरही तिची चाचणी घेण्यात आली. त्या सॅम्पलची तपासणी लंडनच्या लॅबमध्ये करण्यात आल्यानंतर ती दोषी असल्याचे सिद्ध झाले. या घटनेमुळे तिला राष्ट्रकुल स्पर्धेतून निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा राष्ट्रकुल फेडरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माइक हुपर यांनी केली. चिकाने क्लीन प्रकारात 111 किलो, तर जर्क प्रकारात 196 किलो वजन उचलत सगळ्यात कमी वयाची सुवर्णपदक विजेती बनण्याचा बहुमान मिळवला होता. मात्र, हे सर्व क्षणभंगुर ठरले.