आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Daniel Vettori May Not Be Playing Versus England

इंग्‍लंडविरूद्धच्‍या मालिकेसाठी व्हिटोरी खेळण्‍याची शक्‍यता कमी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेलिंग्‍टन- न्‍यूझीलंडचा माजी कर्णधार आणि डावखुरा फिरकीपटू डॅनियल व्हिटोरी इंग्‍लंडविरूद्ध सहा मार्चपासून सुरू होणा-या तीन कसोटी सामन्‍यांच्‍या मालिकेत खेळण्‍याची शक्‍यता कमी आहे. पहिल्‍या कसोटीपूर्वी तो तंदूरूस्‍त होईल याबाबत शंका आहे.

पायाला झालेल्‍या दुखापतीतून तो अजून सावरलेला नाही. मे महिन्‍यातील कसोटीमध्‍ये तो पुनरागमन करू शकतो. त्‍यावेळी न्‍यूझीलंड टीम इंग्‍लंड दौ-यावर जाणार आहे. मात्र, मार्च महिन्‍यापासून प्रथमश्रेणीच्‍या सामन्‍यात खेळण्‍याचे त्‍याचे लक्ष्‍य आहे.

आपण चार दिवसाचे सामने खेळण्‍याच्‍या अद्याप स्थितीत नाही त्‍यामुळे इंग्‍लंडविरूद्धच्‍या कसोटीत खेळणे माझ्यासाठी कठीण असेल, असे व्हिटोरीने सांगितले. तो पुढे म्‍हणाला, माझ्या दुख-या पायाला कधी त्रास होतो तरी कधी होत नाही. निवडकर्त्‍यांसमोरच नाही तर स्‍वत: समोरही फिटनेस सिद्ध करण्‍याचे आव्‍हान माझ्यासमोर आहे. आगामी काळात पाहूयात काय होते ते.