चेन्नई - तब्बल १६ कोटी रुपयांत खरेदी करण्यात आलेला सर्वाधिक महागडा क्रिकेटपटू युवराजसिंगचा आयपीएल-८ मध्ये पहिला सामना गुरुवारी होईल. तो यंदा दिल्ली डेअरडेव्हिल्ससाठी खेळेल. गुरुवारी दिल्ली वि. चेन्नई सुपरकिंग्ज अशी लढत रंगेल. दिल्लीची टीम मागच्या वर्षी अखेरच्या स्थानावर होती. यापूर्वी २०११ मध्येसुद्धा दिल्ली तळाला होती. या वेळी चांगली कामगिरी करून चाहत्यांची मने जिंकण्याचा दिल्ली डेअरडेव्हिल्सचा इरादा असेल.
चेन्नईची मजबूत बाजू
- सुपरकिंग्जचे प्रदर्शन आणि रणनीतीच्या हिशेबाने या संघात मोठा बदल दिसणार नाही. कर्णधार म्हणून धोनी आणि कोच म्हणून स्टीफन फ्लेमिंग यांची जोडी चेन्नईला पुन्हा धमाक्यात मैदानावर कामगिरी करण्यास प्रेरित करू शकते. चेन्नईची टीम अशाच खेळासाठी ओळखली जाते.
- चेन्नईकडून न्यूझीलंडचा कर्णधार आणि स्फोटक फलंदाज ब्रेंडन मॅक्लुम आहे. डेवेन स्मिथसारख्या उत्तम खेळाडूंसह सुरेश रैना, माइक हसी, धोनी, डेवेन ब्राव्हो मधल्या फळीचे आधारस्तंभ असतील.
- जे. पी. डुमिनीच्या नेतृत्वात आयपीएल-८ मध्ये धमाकेदार कामगिरी करण्याचे दिल्लीचे प्रयत्न असतील. युवराजही या वेळी दिल्लीकडून खेळणार आहे.
- युवराजचे वडील योगराज यांच्या विखारी टीकेनंतर धोनी आणि युवी प्रथमच समोरासमोर असतील.