दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी / दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी डर्नबॅचचा इंग्लंड संघात समावेश

Jun 01,2011 01:19:13 PM IST

कार्डिफ - सरेचा वेगवान गोलंदाज जेड डर्नबॅचचा श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड संघात समावेश करण्यात आला आहे.

दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली. दुसऱ्या कसोटीला येत्या शुक्रवारपासून लॉर्डस् येथे प्रारंभ होत आहे. जेम्सस एँडरसन जखमी होऊन संघाबाहेर झाल्याने त्याच्या जागी डर्नबॅचला संधी मिळाली आहे. इंग्लंडने पहिल्या कसोटीत रोमांचक असा १ डाव आणि १४ धावांनी विजय मिळविला होता.

X