आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॅरेन ब्राव्होची खेळी व्यर्थ; हैदराबाद विजयी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहाली - शिखर धवनच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबाद संघाने मंगळवारी रात्री शानदार विजय मिळवला. या संघाने चॅम्पियन्स लीग क्रिकेट स्पध्रेत त्रिनिदाद व टोबॅगोचा 4 गड्यांनी पराभव केला. तिसरा परेरा (57) आणि कर्ण शर्मा (13) यांनी नाबाद खेळी करून संघाला विजय मिळवून दिला.

प्रथम फलंदाजी करताना त्रिनिदाद व टोबॅगोने 8 बाद 160 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात हैदराबादने 6 गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. कर्णधार शिखर धवन (23), जे.पी.ड्युमिनी (17),हनुमा विहारी (13) आणि सॅमी (15) यांनी सुरेख फलंदाजी केली. गोलंदाजीत सुनील नरेनने 4 षटकांत नऊ धावा देऊन चार विकेट घेतल्या. दरम्यान, टोबॅगोच्या ब्राव्होने (66) केलेली अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली.

तत्पूर्वी टोबॅगोचा सलामीवीर सिमन्स भोपळाही न फोडता बाद झाला. त्यानंतर डी. ब्राव्होने लेव्हिससोबत दुसर्‍या गड्यासाठी 49 धावांची भागीदारी केली. ईशांतने लेव्हिसला (22) बाद केले. मोहंमदने (19) ब्राव्होसोबत तिसर्‍या गड्यासाठी 61 धावांची भागीदारी केली. ब्राव्होने 44 चेंडूंत 66 धावा काढल्या.


आजचे सामने
0 पहिला सामना : ओटागो वि. पर्थ स्क्रॉचर्स, दुपारी 4.00 वाजता.
0 दुसरा सामना : राजस्थान रॉयल्स वि. हायवेल्ड लॉयन्स, रात्री 8.00 वाजता.


संक्षिप्त धावफलक
त्रिनिदाद व टोबॅगो : 8 बाद 160 (लेव्हिस 22, ब्राव्हो 66, रामदीन 21, 2/21 सॅमी, 2/26 परेरा, 2/36 ईशांत शर्मा.)
सनरायझर्स हैदराबाद : 6 बाद 164 (धवन 23, परेरा नाबाद 57, 4/9 नरेन).