आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Darren Sammy Shines As West Indies Beat Australia In World Twenty20

आयसीसी टी-20 विश्वचषक : विंडीजकडून कांगारूंची शिकार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मीरपूर - गतविजेत्या वेस्ट इंडीजने शुक्रवारी आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियावर 6 गड्यांनी मात केली. या विजयासह विंडीजने उपांत्य फेरीतील प्रवेशाचा दावा मजबूत केला. आता या टीमचा चौथा सामना 1 एप्रिल रोजी पाकिस्तानशी होईल. ऑस्ट्रेलियाला सलग दुसर्‍या पराभवाला सामोरे जावे लागले. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 8 बाद 178 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात विंडीजने चार गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. क्रिस गेल (53) व सामनावीर डॅरेन सॅमी (नाबाद 34) यांच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर विंडीजने सामना जिंकला. वेस्ट इंडीजला स्मिथ (17) आणि गेलने 50 धावांच्या भागीदारीची सलामी दिली. गेलने सिमन्ससोबत (26) 51 धावांची भागीदारी केली. त्यानंतर डॅरेन सॅमी व डॅवेन ब्राव्होसोबत अभेद्य 49 धावांची भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा अ‍ॅरोन फिंच 16 धावा काढून तंबूत परतला. त्यापाठोपाठ शेन वॉटसनही (2) बाद झाला. अखेर मॅक्सवेलने 45 व हॉजने 35 धावांचे योगदान दिले. ब्रदी, सुनील नरेन आणि मार्लोन सॅम्युअल्सने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया : 8 बाद 178 धावा, वेस्ट इंडीज : 4 बाद 179 धावा