आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • David Coulthard To Perform For Red Bull F1 Showrun In Hyderabad

भारतात पुन्हा परतले... फॉर्म्युला वन फन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - इनफिनिटी रेडबुल रेसिंग रनने पुन्हा एकदा भारतात फॉर्म्युला वनचा रोमांच आणण्यात यश मिळवले. रेडबुल टीमने हैदराबादच्या हुसेन सागर लेकवर आपल्या यशाचा चौकार मारला. येथे १७ वेळेसचा ग्रांप्री चॅम्पियन डेव्हिड कोल्टहार्ड आपल्या चाहत्यांसोबत पोहोचला. त्याने येथे आपल्या चाहत्यांसमक्ष कार आरबी-७ चालवून सर्वांना तल्लीन केले. हैदराबादेत पहिल्यांदा एफ वन कार पोहोचली होती आणि चाहत्यांनी त्याचा पुरेपूर आनंद लुटला.

रेडबुल रेसिंगचा "चौकार'
रेडबुल रेसिंगचे भारतात शो-रनचे चौथ्यांदा यशस्वी आयोजन झाले. यापूर्वी इनफिनिटी रेडबुल रेसिंग टीमने मुंबई, खारदुंगला पास आणि दिल्ली येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. चारही वेळी भारतात ही कार चालवण्यासाठी अँबेसेडर डेव्हिड कोल्टहार्ड आला. खारदुंगला पासवर डेव्हिडने एफ वन कार चालवून वर्ल्ड रेकॉर्डही केला होता. जगातील सर्वांत उंच मोटरेबल रोडवर एफ वन कार चालवण्याचा हा विक्रम होता.

भारतात येऊन आनंदी
भारतात येऊन मी खूप आनंदी झालो आहे, असे डेव्हिड कोल्टहार्डने आपली कमाल दाखवल्यानंतर म्हटले. येथील चाहत्यांकडून मला नेहमी प्रेम, सन्मान मिळतो. यामुळे येथे येण्यास आवडते.