आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • David Cup News In Marathi, Somdev, Divya Marathi

सोमदेव प्रसन्न ! , सर्बियाविरुद्ध लढतीत यजमान भारतीय संघाने साधली बरोबरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - भारतीय टेनिस चाहत्यांना रविवारी सोमदेव पावला. सर्बियाविरुद्ध सुरू असलेल्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात सोमदेव देववर्मनने शानदार खेळ करत विजय मिळवला. सोमदेवने पाच सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत सर्बियाच्या दुसान लाजोविकला पराभूत केले. या विजयासह भारताने सर्बियाविरुद्ध लढतीत २-२ अशी बरोबरी केली आहे. आता भारताची सर्व मदार युकी भांबरीच्या एकेरीच्या लढतीवर अवलंबून आहे. युकी भांबरीने विजय मिळवल्यास भारतीय टेनिस संघ वर्ल्ड ग्रुप प्ले ऑफ फेरीत प्रवेश करेल. युकीचा सामना सर्बियाच्या िफलिप क्रॅजिनोिवकविरुद्ध होईल.

रविवारी सोमदेवचा सामना सर्बियाच्या दुसान लाजोिवकविरुद्ध होता. सर्वांच्या नजरा या लढतीवर िटकून होत्या. सोमदेवची सुरुवात चांगली झाली नाही. पहिला सेट त्याने १-६ असा सहजपणे गमावला. मात्र, दुसऱ्या सेटमध्ये त्याने ६-४ असे दमदार पुनरागमन केले. ितसऱ्या सेटमध्ये दुसानने पुन्हा पुनरागमन करत ४-६ ने बाजी मारली. अखेरच्या दोन्ही सेटमध्ये सोमदेवने ६-३, ६-२ ने िवजय िमळवत भारताच्या आशा जिवंत ठेवल्या.

पेस, बाेपन्ना विजयी
शनिवारी िलएंडर पेस आणि रोहन बोपन्ना या भारतीय जोडीने सर्बियाची जोडी नेनाद िजमोंिजक आणि इलजा बोजोलिकवर १-६, ६-७, ६-३, ६-३, ८-६ अशा फरकाने मात केली. पेस-बोपन्नाने पुनरामन करत बाजी मारली होती. रविवारी सोमदेवने सर्व भारतीय चाहत्यांना जल्लोष करण्यास भाग पाडले. सोमदेवने िवजय िमळवताच चाहत्यांनी त्याला खाद्यांवर उचलून फेरी मारली.

०३ तास ४१ मिनिटांत साेमदेव विजयी
०२ ने साेमदेवने दुसानविरुद्ध झुंज जिंकली

स्वित्झर्लंड फायनलमध्ये
राॅजर फेडररच्या निर्णायक विजयाच्या बळावर स्वित्झर्लंडने २२ वर्षांनंतर डेव्हिस चषकाच्या फायनलमध्ये धडक मारली. स्विस किंग फेडररने इटलीच्या फाेबियाे फाेगनिनीचा पराभव केला. २१ नाेव्हेंबरला स्विसचा अंतिम सामना फ्रान्सशी हाेईल. स्वित्झर्लंडने १९९२ व फ्रान्सने २०१० मध्ये अंतिम फेरी गाठली हाेती.