छायाचित्र: डेव्हिड फेरर
शांघाय - स्पेनच्या डेव्हि ड फेररने गुरुवारी शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या तिस-या फेरीत धक्कादायक विजयाची नोंद केली. त्याने पुरुष एकेरीच्या लढतीत लंडन ऑलिम्पिक चॅम्पियन अँडी मरेला सरळ सेटमध्ये धूळ चारली. स्पर्धेतील ११ व्या मानांकित फेररने लढतीत २-६, ६-१, ६-२ अशा फरकाने रोमहर्षक विजय मिळवला. यासह त्याने स्पर्धेच्या चौथ्या फेरीत धडक मारली.
पराभवासह इंग्लंडच्या मरेचा आगामी लंडन फायनल्स टेनिस स्पर्धेतील प्रवेशाचा मार्ग कठीण झाला आहे. यापूर्वी सर्बियाचा नोवाक योकोविक, रॉजर फेडरर आणि
राफेल नदालने या स्पर्धेतील
आपला प्रवेश निश्चित केला आहे. फेररविरुद्ध पहिल्या सेटमध्ये बाजी मारल्यानंतर मरेने आघाडी घेतली होती. त्यानंतर स्पेनच्या खेळाडूने पुनरागमन केले. त्याने आक्रमक सर्व्हिस करताना दुसरा सेट जिंकून लढतीत बरोबरी साधली. त्यानंतर तिसरा सेट जिकंला.
टॉमस बर्डिच विजयी
सातव्या मानांकित टॉमस बर्डिचने चौथ्या फेरीत धडक मारली. त्याने एक तास चार मिनिटांच्या रंगतदार लढतीत शानदार विजय मिळवला. चेक गणराज्यच्या या खेळाडूने लढतीत क्रोएशियाच्या इवो कालरेविचला ६-२, ६-३ अशा फरकाने पराभूत केले. दुसरीकडे फ्रान्सच्या ज्युलियन बेनातूने अमेरिकेच्या जॅक सोकवर ६-३, ६-४ ने मात केली.