आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • David Warner Out Of West Indies Series Due To Injury

दुखापतीमुळे डेव्हिड वॉर्नरची वेस्ट इंडीजविरुद्ध मालिकेतून माघार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्थ- अंगठय़ाला दुखापत झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने वेस्ट इंडीजविरुद्ध आगामी देशांतर्गत मालिकेतून माघार घेतली आहे. भारत दौर्‍यातसुद्धा त्याचा सहभाग अनिश्चित मानला जात आहे.

बुधवारी वाकाच्या मैदानात नेटवर सरावादरम्यान फलंदाजी करताना वॉर्नरला दुखापत झाली होती. स्कॅन केल्यानंतर अंगठय़ात फ्रॅक्चर असल्याचे सिद्ध झाले. ऑस्ट्रेलिया टीमचे फिजिओ केविन सिंस यांनी ही माहिती दिली.