आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रूटसोबत भांडण केल्याने डेव्हिड वॉर्नरला वगळले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन/सिडनी - ऑस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळत असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर करण्यात आले आहे. दारू ढोसून इंग्लंडचा क्रिकेटपटू जो रूटसोबत हाणामारी करण्याचा आरोप त्याच्यावर आहे. बुधवारी न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया सामन्यात वॉर्नरला संघात स्थान मिळाले नाही.


क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) बुधवारी या बातमीला दुजोरा देताना संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. चौकशीनंतरच वॉर्नरच्या शिक्षेबाबत निर्णय होईल. चौकशी समितीचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत वॉर्नर एकही सामना खेळणार नाही.


सीएने ट्विटरवर म्हटले की, ‘इंग्लंडमध्ये डेव्हिड वॉर्नरने दारू ढोसून केलेल्या प्रकरणाबद्दल आम्हाला माहिती आहे. आम्ही प्रकरणाची चौकशी करीत आहोत. चौकशी झाल्यानंतरच सीएकडून संपूर्ण माहिती दिली जाईल.’