रोम - एएस रोमा आणि इंटर मिलान यांच्यामध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यामध्ये प्रतीस्पर्धी खेळाडूंमध्ये तुंबळ हाणामारीचे दर्शन घडले. रोमाचा खेळाडू रोसीने इंटरमिलानच्या माऊरो इकार्डीला जोरदार ठोसा लगावला. त्याच्या या कृत्यामुळे त्याच्यावर तीन सामन्यांची बंदी लावण्यात आली.
हा सामना टीव्हीवर दाखविल्या जात होता. त्यामध्ये स्पष्ट दिसत होते, रोसीने प्रतिस्पर्धेकाचे डोके खाली दाबून जोरदार ठोसा लगावला आहे्. मात्र त्याविरुध्द प्रतिस्पर्धी खेळाडूंनी पंचांकडे दाद मागितलेली नाही. परंतु सेरी- ऐ च्या शिस्त समितीने रोसीवर पुढील तीन सामन्यांवर बंदी घातली आहे. तर याच सामन्या दरम्यान जीससने रोमाच्या खेळाडू एलेसियो रामागनोली याच्या पाठीमध्ये ठोसा लगावला होता.
फुटबॉलपटूंमध्ये झालेल्या भांडणांची छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...