आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deepika Kumari Continuously Win National Championship Six Time

दीपिकाकुमारी पुन्हा चॅम्पियन, राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत सलग सहाव्यांदा विजेती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जमशेदपूर - जगातल्या टॉप-10 तिरंदाजांत सामील असलेली 19 वर्षीय भारतीय महिला खेळाडू दीपिकाकुमारीने सलग सहाव्यांदा राष्ट्रीय वरिष्ठ तिरंदाजी चॅम्पियनशिपच्या रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक जिंकले. सुवर्णपदक जिंकून तिने राष्ट्रीय विजेतेपदाचा किताब आपल्याकडेच कायम ठेवला.
2009 मध्ये पुण्यात झालेल्या 29 व्या राष्ट्रीय चॅम्पियनशिपपासून दीपिका सलगपणे चॅम्पियन ठरली आहे. येथे जेआरडी टाटा कॉम्प्लेक्समध्ये गुजरातच्या कि. वी. परिणीताला फायनलमध्ये हरवून तिने बाजी मारली. या वेळी तिने राष्ट्रीय विक्रम करताना तीन प्रकारांत सुवर्ण जिंकले.