आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता वैयक्तिक कामगिरी सुधारण्याचे लक्ष्य : दीपिकाकुमारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सध्या सांघिक गटात माझी उत्कृष्ट कामगिरी होत असल्याने मी आनंदी आहे. मात्र, वैयक्तिक गटातील कामगिरीकडे मला आता लक्ष देणे गरजेचे झाले आहे, असे मत भारताची अव्वल महिला तिरंदाज दीपिकाकुमारीने व्यक्त केले.

वर्ल्डकप स्टेज-3 तिरंदाजी स्पर्धेत सांघिक गटात मिळवलेल्या सुवर्णपकदामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे आता वैयक्तिक प्रकारात सुधार करण्याचा माझा प्रयत्न असेल, असे ऑलिम्पिकपटू दीपिकाकुमारी म्हणाली.
मेडेलिन येथे झालेल्या वर्ल्डकप स्टेज-3 तिरंदाजी स्पर्धेत भारतीय पुरुष व महिला संघाने पदक पटकावल्यानंतर शहरात आगमन झालेल्या दीपिकासह संघाचे विमानतळावर साईतर्फे जोरदार स्वागत करण्यात आले. ‘सध्या भारतीय संघ चांगली कामगिरी करत आहे. पोलंड येथे 15 ऑगस्टदरम्यान होणार्‍या वर्ल्डकप स्टेज 4 तिरंदाजी स्पर्धेत पदक पटकावण्याचे संघाचे लक्ष्य असणार आहे. सांघिक गटात भारतीय संघ जगात पुढे आहे. गेल्या दोन वर्षांत संघाची कामगिरी खालावली होती. आता मात्र भारतीय संघ पुन्हा एकदा लयीत आला असून पुरुष व महिला या दोन्ही संघाने पदके पटकावली आहेत. पोलंड येथील स्पर्धेसाठी वेळ कमी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सराव करण्यावर भर देणार आहे, ’ असे दीपिका म्हणाली. याप्रसंगी साईचे के. संतोष, एल. कुर्मी, विजय धिमन यांची उपस्थिती होती.

जिल्हा संघटना झोपेत
जागतिक तिरंदाजीत सुवर्णपदक जिंकल्यानंतर भारतीय संघाचे गुरुवारी औरंगाबाद विमानतळावर आगमन झाले. संघाचे स्वागत करण्याचे औपचारिक कामदेखील जिल्हा धनुर्विद्या संघटनेला करता आले नाही.