आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक स्पर्धेत दीपिकाची रौप्यपदकाची हॅट्ट्रिक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जगातील माजी नंबर वन दीपिकाकुमारीने जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सलग तिस-यांदा रौप्यपदक जिंकण्याची हॅट्ट्रिक केली. तिने पुन्हा एकदा शानदार कामगिरी करताना पॅरिस येथील जागतिक तिरंदाजी स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. यापूर्वी भारताची युवा महिला तिरंदाज दीपिकाने 2011 (टोकियो) आणि 2012 (इस्तंबूल) मध्ये रौप्यपदक पटकावले होते.


फायनलमध्ये कोरियाच्या ओ ही य्नकडून पराभव झाल्याने दीपिकाला रौप्यवरच समाधान मानावे लागले. तिने 3-1 ने आघाडी घेतली होती. मात्र, युनने अखेरीस 6-4 अशी आघाडी घेऊन पदक जिंकले. 2008 मध्ये ऑलिम्पिक चॅम्पियन ठरलेल्या कोरियन खेळाडूसाठी 2010 नंतर जागतिक स्पर्धेतील हे दुसरे सुवर्णपदक ठरले.


औरंगाबादच्या साई सेंटरमधील सराव फलदायी
औरंगाबादचे साई सेंटर चांगले असून, येथे तिरंदाजांना पोषक असे वातावरण आहे. येथे सरावाचा खूप फायदा होतो, असे दीपिकाने ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले होते. दीपिकाचे शब्द खरे ठरले. या वेळी तिने जागतिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. दीपिकासह आगामी वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि आशियाई स्पर्धेसाठी 16 खेळाडूंची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. चॅम्पियनशिपसाठी 12 आणि आशियाई स्पर्र्धेसाठी 16 तिरंदाजांचा समावेश आहे.


दीपिका सुवर्ण जिंकेलच !
दीपिकाकुमारीकडे गुणवत्ता भरपूर आहे. तिच्याकडे टॅलेंटची कमी नाही. ती मेहनतीसुद्धा आहे. नशिबाची साथ नसल्याने तिचे सुवर्ण हुकले. पुढच्या स्पर्धेत ती निश्चित सुवर्ण जिंकेल. - वीरेंद्र भंडारकर, सहायक संचालक, साई.