(फोटोओळ - दिनेश कार्तिक समवेत सुवर्णपदक विजेती दिपिका पल्लीकल)
स्क्वॅशमध्येही अखेर भारतीय तिरंगा झळकला. स्क्वॅशमध्ये महिलांच्या दुहेरीत भारतीय खेळाडू दीपिका पल्लिकल आणि जोश्ना चिनप्पा यांनी सुवर्णपदक जिंकले. स्क्वॅशमधे भारताला प्रथमच सुवर्णपदक मिळाले आहे. या दोघींनी फायनलमध्ये इंग्लंडची जोडी जेनी डुनकाल्फ आणि लॉरा मसारो यांना दोन सेटमध्ये 11-6, 11-8 ने पराभूत केले. खूप कमी लोक जाणतात की, दिपिकाचे लग्न क्रिकेटपटू दिनेश कार्तिकसोबत झाले आहे.
फिटनेस सेंटरमध्ये झाली होती भेट
दिपिका पल्लीकन आणि दिनेश कार्तिक यांची पहिली भेट चेन्नईच्या फिटनेस सेंटरमध्ये झाली होती. दोघेही एका फिटनेस प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण घेत होते. तेथूनच प्रेमाला सुरुवात झाली. दिपिका आणि दिनेशमध्ये प्रेमाचा संवाद सुरु झाला.
2013 मध्ये दिनेश कार्तिक इंग्लड दौ-यावर गेला असताना तेथे त्याच्यापूर्वीच स्क्वॅशच्या प्रशिक्षणासाठी दीपिका गेली होती. दोघांची तेथे भेट झाली. आणि दिनेशने चॅम्पियन ट्रॉफी जिंकत दीपिकाचे दिलसुध्दा जिंकले. आणि इंग्लडमधून खरी प्रेमाची सुरुवात झाली.
15 नोव्हेंबर 2013 रोजी झाले शिक्कामोर्तब
दीपिका दिनेशला चिअरअप करण्यासाठी मैदानात येत होती. दोघांच्याही प्रेमाच्या चर्चा झडत असताना 15 नोव्हेंबर 2013 रोजी दोघांनी साखरपुडा करून चर्चेला पुर्णविराम दिला.
पुढील स्लाइडवर पाहा, दिनेश आणि दीपिकाचे निवडक छायाचित्रे..