मकाऊ - गतविजेत्या पी. व्ही. सिंधूला दुसर्यांदा मकाऊ ओपन ग्रँड प्रिक्स बॅडमिंटन स्पर्धेतील किताबाची संधी आहे. दुसर्या मानांकित सिंधूने शनिवारी महिला एकेरीची अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे भारताचा युवा खेळाडू एच.एस.प्रणवला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. जागतिक स्पर्धेतील दोन वेळची कांस्यपदक विजेती सिंधूने उपांत्य लढतीत आठव्या मानांकित बुसाननचा पराभव केला. तिने २१-१४, २१-१५ अशा फरकाने उपांत्य सामना
आपल्या नावे केला. याशिवाय तिने अवघ्या ४२ मिनिटांत अंतिम फेरी गाठली. तिसर्या मानांकित प्रणवचे अंतिम फेरीतील प्रवेशाचे स्वप्न भंगले. त्याला वोंग विंगने २१-१६, १६-२१, २१-१२ अशा फरकाने पराभूत केले.