आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Defending Champion Kei Nishikori Wins Stuttgart Open

स्टुटगार्ट अाेपन टेनिस स्पर्धा : केर्बर, केई निशिकाेरी चॅम्पियन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्लिन - जर्मनीची एंजेलिक केर्बर रविवारी स्टुटगार्ट अाेपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत चॅम्पियन ठरली. दुसरीकडे जपानच्या केई निशिकाेरीने बार्सिलाेना अाेपनचे विजेतेपद पटकावले.
बिगरमानांकित केर्बरने एकेरीच्या अंतिम सामन्यात जगातील माजी नंबर वन कॅराेलिना वाेज्नियाकीचा पराभव केला. तिने रंगतदार लढतीमध्ये ३-६, ६-१, ७-५ अशा फरकाने राेमहर्षक विजयाची नाेंद केली. यासाठी तिला जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या वाेज्नियाकीने तब्बल दाेन तास झुंजवले. दुहेरीत माटेक सॅड्स अाणि लुसी सफाराेवाने विजेतेपद अापल्या नावे केले.
दुसऱ्यांदा विजेतेपद
केईनिशिकाेरीने सलग दुसऱ्यांदा बार्सिलाेना अाेपन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले. त्याने गतवर्षीदेखील ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला हाेता.
पाब्लाेचा पराभव
जपानच्याकेई निशिकाेरीने बार्सिलाेना अाेपन टेनिस स्पर्धेत किताब पटकावला. त्याने अंतिम सामन्यात स्पेनच्या पाब्लाे एंदुजारचा पराभव केला. जपानच्या खेळाडूने ६-४, ६-४ ने सामना जिंकला. यासह त्याने किताबावर नाव काेरले. या वेळी पाब्लाेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
फोटो - किताबासह केई निशिकाेरी आणि विजेतेपदासह अभिवादन करताना केर्बर.