आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Defending Champion Roger Federer Knocked Out Of Wimbledon

नदालपाठोपाठ रॉजर फेडरर, शारापोवाही विम्‍बल्‍डनमधून बाहेर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- विम्‍बल्‍डन टेनिस चॅम्पियनशिपमध्‍ये धक्‍के बसणे सुरूच आहे. फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकाविणारा राफेल नदाल पहिल्‍याच सामन्‍यातून बाहेर पडल्‍यानंतर आता सात वेळा विम्‍बल्‍डनचे विजेतेपद मिळवणारा स्वित्‍झर्लंडचा अव्‍वल खेळाडू रॉजर फेडरर आणि रशियाची मारिया शारापोव्‍हाही स्‍पर्धेबाहेर पडले आहेत.

तिस-या मानांकित फेडररचा दुस-या फेरीत पराभव झाला. युक्रेनच्‍या सर्जेई स्‍टकोवस्‍कीने त्‍याला चार सेटमध्‍ये 6-7, 7-6, 7-5 आणि 7-6 असा पराभव केला. गतवर्षी फेडररच विम्‍बल्‍डनच विजेता ठरला होता. नदाल स्‍पर्धेतून बाद झाल्‍यानंतर फेडररला किताबाचा दावेदार मानन्‍यात येत होते. मात्र, तोही आता या स्‍पर्धेतून बाहेर पडला आहे.

सुरूवातीपासून स्‍टाकोवस्‍कीने त्‍याला कडवे आव्‍हान दिले होते. तरीसुद्धा फेडररने पहिला सेट ट्रायबेकरमध्‍ये जिंकला. मात्र, त्‍यानंतर पुढचे तिन्‍ही सेट जिंकून स्‍टाकोवस्‍कीने इतिहास रचला. अधिक माहितीसाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...