आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबर्मिंगहम- सोमवारी पाकिस्तान संघावर मिळालेल्या विजयावर आनंद व्यक्त करताना दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलियर्सने पुढच्या सामन्यात वेगवान गोलंदज डेल स्टेन खेळण्याची शक्यता वर्तवली आहे.
डिव्हिलियर्सने म्हटले की, कठीण विकेटवर चांगल्या गोलंदाजी आक्रमणासमोर 200 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य चांगले आहे. पाकिस्तानविरूद्धचा विजय चांगला होता. आम्ही कठीण विकेटवर उत्कृष्ठ गोलंदाजीसमोर 200 पेक्षा जास्त धावा जमवल्या. पाकिस्तानच्या तीन फिरकीपटूंनी चांगली गोलंदाजी केली.
तो म्हणाला, सुरूवातीला 234 धावांवर आम्ही खूश नव्हतो. मात्र, जेव्हा मी बाद झालो तेव्हा मी विचार केला 220 धावा चांगले आव्हान असेल. ख्रिस मॉरिसचे वनडे पदार्पणही चांगले राहिले. पुढच्या सामन्यात स्टेन खेळण्याची शक्यता असल्याचे त्याने म्हटले. हाशिम अमलाला त्याच्या 81 धावांच्या खेळीमुळे सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.