आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Daredevils (DD) Vs Royal Challengers Bangalore News In Divya Marathi

आयपीएल-7 : आज दिल्लीपुढे विराट आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शारजाह - संघात अनेक बदल केल्यानंतर नव्या तार्‍यांसह दिल्ली डेअरडेव्हिल्स इंडियन प्रीमिअर लीगच्या सातव्या सत्रात आपला पहिला सामना रॉयल चॅलेंर्जस बंगळुरूसोबत गुरुवारी खेळेल. दिल्लीकडून दिनेश कार्तिक तर बंगळुरू संघाकडून क्रिस गेल, विराट कोहली, युवराजसिंग आणि एल्बी डिव्हिलर्स मुख्य आकर्षण असतील.

टीम इंडियाला आपल्या मार्गदर्शनाखाली 2011 मध्ये वनडे वर्ल्डकपचे विजेतेपद मिळवून देणारे आफ्रिकेचे गॅरी कस्र्टन दिल्लीचे कोच आहेत. त्यांना या वेळी दिल्लीकडून दमदार प्रदर्शनाची आशा आहे. दिल्लीचा पूर्ण संघ जवळपास बदलला आहे. नव्या रूपात, नव्या रंगात, नव्या खेळाडूंसह दिल्लीची टीम स्पध्रेत उतरत आहे. दुसरीकडे त्यांचा सामना विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली बंगळुरूशी आहे. विराट कोहली जबरदस्त फॉर्मात आहे. नुकत्याच झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये त्याने प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार जिंकला होता. बंगळुरूकडून युवराजसिंग, क्रिस गेल, एल्बी डिव्हिलर्स आणि कोहली फलंदाजीत मोठा स्कोअर उभा करण्यात सक्षम आहेत. गोलंदाजीत स्टार्क, रामपॉल यांच्यावर मदार असेल.

पीटरसन आजच्या सामन्याला मुकणार
दिल्ली डेअरडेव्हिल्सला आयपीएल-7 च्या पहिल्या सामन्यापूर्वीच धक्का बसला आहे. दिल्लीचा नवा कर्णधार इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पीटरसन पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंर्जस बंगळुरूविरुद्ध खेळू शकणार नाही. पीटरसन बोटाच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. त्याच्या जागी दिनेश कार्तिक दिल्लीचे नेतृत्व करेल. दिल्लीचे सहायक प्रशिक्षक एरिक सिमन्स यांनी बुधवारी सायंकाळी ही माहिती दिली.