आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL : चीयरलीडर्सवर लागणार बॅन? दिल्ली डेअरडेव्हिल्सने तोडले नाते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पुढील वर्षी होणाऱ्या इंडियन प्रीमियल लीग (आयपीएल) मध्ये भलेही चौकार , षटकारांची बरसात होईल पण त्याचा आनंद साजरा करण्यासाठी मैदानात चीयरलीडर्स नसतील. सूत्रांच्या माहितीनुसार, बीसीसीआय याच वर्षी चीयरलीडर्सवर बंदी आणण्याचा विचार करत आहे. आयपीएलच्या सहाव्या पर्वात स्पॉट फिक्सिंगचे डाग आयपीएलवर पडले आहे. त्यामुळे बीसीसीआयने क्रिकेटर्सचे लक्ष्य फक्त क्रिकेट असेल यावर जोर दिला आहे.
चीयरलीडर्सवर बंदी घालण्याचा विचार बीसीसीआय करत असतानीच शनिवारी झालेल्या सामन्या दरम्यान दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या चीयरलीडर्स दिसल्या नाही. शनिवारी हैदराबाद सनरायझर्सविरुद्धच्या सामन्यावेळी दिल्ली टीमने चीयरलीडर्सला नकार दिला होता. टीमच्या मॅनेजमेंटला वाटत आहे, की चीयरलीडर्समुळे खेळात नवीन काहीच घडत नाही.
दिल्ली डेअरडेव्हिल्सचे सीईओ हेमंत दुआ म्हणाले, टीमच्या मॅनेजमेंटला वाटते की चीयरलीडर्सची काहीच आवश्यकता नाही. त्यांच्याऐवजी ड्रमर असले तर ते अधिक उत्साह निर्माण करु शकतात. दुआ म्हणाले, की आमची धारणा आहे, की यापेक्षा दिल्लीच्या लोकल टॅलेंटला संधी देण्याची गरज आहे. त्यामुळेच दिल्लीच्या फेरोज शहा कोटला मैदानावर आम्ही तशी व्यवस्था केली आहे. जेव्हा आम्ही इतर ठिकाणी खेळू तेव्हा तेथील मॅनेजमेंट अशी व्यवस्था करेल.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या चीयरलीडर्स