आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Daredevils Vs Sunrisers Hyderabad IPL Live

IPL: हैदराबादची दिल्लीवर मात, वीरेंद्र सेहवाग ठरला पुन्हा फ्लॉप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सनरायझर्स हैदराबाद संघाने शुक्रवारी आयपीएल-6 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सवर 3 गड्यांनी मात केली. हैदराबादचा हा तिसरा विजय ठरला. प्रथम फलंदाजी करताना जयवर्धनेच्या दिल्लीने 8 बाद 114 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात संगकाराच्या हैदराबादने 19.2 षटकांत 7 गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. दिल्लीचा सलग चौथा पराभव झाला. अमित मिश्रा सामनावीरचा मानकरी ठरला.

धावांचा पाठलाग करणा-या हैदराबादचा सलामीवीर ए.रेड्डी (1) बाद झाला. त्यानंतर पार्थिव पटेल व संगकाराने दुसºया विकेटसाठी 45 धावांची भागीदारी केली. नदीमने या जोडीला फोडले.त्याने पार्थिवला (19) बाद केले. संगकाराने 28 धावांचे योगदान देऊन तंबू गाठला. चौथ्या क्रमांकावर जी. विहारी (17), आशिष रेड्डी (16) यांनी चांगली खेळी करून संघाच्या धावसंख्येला गती दिली. अखेर अमित मिश्राने (16) तळातल्या डेल स्टेनसोबत (9) अभेद्य 15 धावांची भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला. दिल्लीकडून नदीम व एम. मोर्केलने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणा-या दिल्लीची सुरुवात चांगली झाली नाही. संघाची धावसंख्या 26 असताना डेव्हिड वॉर्नर (0), वीरेंद्र सेहवाग (12) आणि महेला जयवर्धने (12) बाद झाले. इतर फलंदाजांनी सपशेल निराशाजनक कामगिरी केली. जोहान बोथा (15) व मनप्रीत जुनेजा (9) बाद झाले. दरम्यान, इरफान पठाण (23) व केदार जाधव (नाबाद 30) यांनी संघाचा डाव सावरला. मात्र, टी. परेराने पठाण आणि एम. मोर्गेनला बाद झाला. अखेर दिल्ली संघाने 8 गड्यांच्या मोबदल्यात 114 धावा काढल्या.
संक्षिप्त धावफलक - दिल्ली : 8 बाद 114 धावा, पराभूत वि. हैदराबाद- 7 बाद 115 धावा.