आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL : बंगळुरूचा दिल्लीवर रोमांचक विजय, कर्णधार कोहलीच्या 99 धावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आयपीएल-6 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शुक्रवारी फिरोजशहा कोटलावर दिल्ली डेअरडेव्हिल्सवर 4 धावांनी रोमांचक विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने 4 बाद 183 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्लीला 7 गड्यांच्या मोबदल्यात 179 धावांपर्यंत मजल मारता आली. बंगळुरूच्या सामनावीर जयदेव उनाडकतने 25 धावा देत पाच बळी घेतले.


तत्पूर्वी नाणेफेक जिंकून दिल्ली डेअरडेव्हिल्सने घरच्या मैदनावर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आलेल्या बंगळुरूची निराशाजनक सुरुवात झाली. टीमचा सुपरस्टार क्रिस गेलला (4) आल्यापावलीच तंबूत परतावे लागले. त्याला इरफान पठाणने त्रिफळाचीत करून दिल्लीला महत्त्वाचा बळी मिळवून दिला. मात्र, त्यानंतर विराट कोहलीने कर्णधार पदाला साजेशी खेळी केली. 58 चेंडंूत दहा चौकार आणि चार षटकार ठोकून 99 धावा काढल्या. यासह त्याला साथ देणा-या डिव्हिलर्सने नाबाद 32 आणि हेनरिक्सने 26 धावांचे योगदान दिले. कोहलीने हेनरिक्ससोबत तिस-या गड्यासाठी 57 धावांची भागीदारी केली. नदीमने हेनरिक्सला बाद केले. एल्बी डिव्हिलर्सने कोहलीला महत्त्वपूर्ण साथ दिली. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी 94 धावांची भागीदारी केली. यामुळे बंगळुरूने 183 धावांचा पल्ला गाठला.

बंगळुरूच्या विराट कोहली आणि डिव्हिलर्सने शेवटच्या पाच षटकांत 84 धावा काढल्या. सामन्यातील 18 व्या षटकात उमेश यादवच्या चेंडूवर कोहलीने दोन षटकार आणि एक चौकार ठोकला. दुसरीकडे डिव्हिलर्सने एका चौकार मारला. या सुमार कामगिरीनंतरही कर्णधार जयवर्धनने शेवटची ओव्हर यादवला देण्याची चूक केली. या षटकात कोहलीने दोन षटकार आणि दोन चौकार मारले. या दोघांनी या षटकात एकूण 23 धावा काढून संघाला सन्मानजनक धावसंख्या उभी करून दिली.

संक्षिप्त धावफलक
बंगळुरू- 4 बाद 183 धावा वि.वि. दिल्ली -7 बाद 179.
कोहली-डिव्हिलर्सच्या शेवटच्या 30 चेंडूत 84 धावा