आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Police Commissioner Neeraj Kumar Daughter Angle In Latest Ipl Conflict Of Interest

BCCI: लाभाच्या पदावरून वाद, माजी पोलिस आयुक्तांच्या कन्येचे साटेलोटे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट नियामक मंडळात (बीसीसीआय) लाभाच्या पदावरून पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे. विशेष म्हणजे हा वाद बीसीसीआयचे भ्रष्टाचारविरोधी आणि सुरक्षा पथकाच्या (एसीएसयू) मुख्य सल्लागारपदी नियुक्त झालेले दिल्लीचे माजी पोलिस आयुक्त नीरज कुमार आणि त्यांची कन्या अंकिताशी संबंधित आहे.

रजिस्ट्रार ऑफ कंपनीचा (आरओसी) दस्ताऐवजनुसार, आयपीएल गव्हर्निंग काउंसिलचे चेअरमन राजीव शुक्ला यांची पत्नी अनुराधा प्रसादद्वारा प्रमोट करण्‍यात आलेल्या बिझनेस कंपन्यांशी नीरज कुमार यांची धाकटी कन्या अंकिताचे साडेलोटे असल्याची माहिती मिळाली आहे.
31 मार्च 2014 रोजी समाप्त झालेल्या आर्थिक वर्षाच्या अहवालानुसार, अंकिता ही आरओसीच्या 'ई 24 ग्लॅमर लिमिटेड'ची डायरेक्टर आहे. तसेच आरओसीच्या अहवालानुसार, अंकिता ही 2013 पर्यंत अनुसाधा प्रसादद्वारा संचलित स्कायलाइन रेडिओ नेटवर्क लिमिटेड आणि न्यूज 24 ब्राडकॉस्ट इंडिया लिमिटेडमध्ये डायरेक्टरपदी कार्यरत होती. परंतु, अंकिताने तिन्ही कंपन्यांचा राजीनामा दिला असून तिचा कंपन्यांशी काहीही संबंध नाही.
दरम्यान, दिल्लीचे माजी पोलिस आयुक्त नीरज कुमार यांची बीसीसीआयने सोमवारी (20 एप्रिल) भ्रष्टाचारविरोधी आणि सुरक्षा पथकाच्या (एसीएसयू) मुख्य सल्लागारपदी वर्षभरासाठी नियुक्ती केली. आयपीएल संचालन परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

नीरज कुमार यांना एसीएयूचे मुख्य सल्लागारपदी नियुक्त करण्यात आली असून त्यांचा कार्यकाळ वर्षभराचा असेल, असे आयपीएलचे आयुक्त राजीव शुक्ला यांनी जाहीर केले. याआधी रवी वसानी हे एसीएसयूचे प्रमुख होते. त्यांचा कार्यकाळ संपला आहे.बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर म्हणाले, कुमार यांच्याच नेतृत्वात दिल्ली पोलिसांनी माजी कसोटी गोलंदाज एस. श्रीसंत, स्पिनर अंकित चव्हाण आणि अजित चंडिला यांना आयपीएलदरम्यान राजस्थान रॉयल्सकडून खेळताना स्पॉट फिक्सिंगप्रकरणी अटक केली होती.
बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या लाभाच्या पदांवरून यापूर्वीही अनेकदा वाद चव्हाट्यावर आले आहेत. अशाच एका प्रकरणात आयपीएलमधील एका संघाचे मालक आणि बीसीसीसीचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन यांना सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आपले पद सोडावे लागले होते. याशिवाय सुप्रीम कोर्टाने चेन्नई सुपर किंग्जशी संबंधित सर्व अधिकार्‍यांना बीसीसीआयची निवडणूक लढवण्यास बंद घातली होती. इंडियन क्रिकेटमधील भ्रष्टाचार तसेच आयपीएलमधील स्पॉट-फिक्सिंग व बेटिंग थांबवण्यासाठी नीरज कुमार व शुक्ला यांच्याकडे असलेली पदे महत्त्वाची आहेत.

राजीव शुक्ला म्हणाले, विवाहानंतर अंकिताने सोडले पद...
राजीव शुक्ला म्हणाले की, 'अंकिता 2010-2011 दरम्यान कंपनीत कार्यरत होती. पत्नी अनुराधा प्रसाद यांच्यासोबत डायरेक्टरपदावर अंकिता कंपनीचे काम पाहात होती. मात्र, अंकिताचा विवाह झाल्यानंतर तिने कंपनीला राजीनामा दिल्याचे सांगत राजीव शुक्ला यांनी सारवासारव केली आहे.

परंतु, आरओसीच्या अहआलानुसार, स्कायलाइन रेडिओ नेटवर्कमध्ये जून 2013 तसेच न्यूज 24 ब्राडकॉस्ट इंडिया लिमिटेडमध्ये 31 मार्च 2013 पर्यंत अंकिता डायरेक्टर पदी कार्यरत होती.