आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Police Will File Application To Cancel Sreesanth's Bail

श्रीसंतचा जामीन रद्द करण्‍यासाठी दिल्‍ली पोलिस करणार अर्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्‍ली- दिल्‍ली पोलिसांनी इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्‍पॉट फिक्सिंग प्रकरणातील आरोपी राजस्‍थान रॉयल्‍स टीमचा खेळाडू शांताकुमारन श्रीसंत आणि इतर 20 लोकांचा जामीन रद्द करण्‍यासाठी अर्ज दाखल करणार आहे.

दिल्‍ली पोलिस विशेष आयुक्‍त (विशेष शाखा) एसएन श्रीवास्‍तव यांनी आयपीएल स्‍पॉट फिक्सिंग प्रकरणी आरोप पत्र दाखल करेल आणि त्‍याचबरोबर श्रीसंतसहित इतर 21 आरोपींचा जामीन रद्द करण्‍यात यावा यासाठी अर्ज करेल अशी माहिती दिली.

आतापर्यंत याप्रकरणी 29 लोकांना अटक करण्‍यात आली. त्‍यातील 21 लोकांना जामीन तर आठ लोक अजून न्‍यायालयीन कोठडीत आहेत. राजस्‍थान रॉयल्‍सचे खेळाडू श्रीसंत, अंकित चव्‍हाण आणि अजित चंदीला यांना याप्रकरणी 16 मे रोजी मुंबईतून अटक करण्‍यात आली होती. अंकित आणि श्रीसंतला जामीन मिळाला तर चंदीला अजूनही तिहार तुरूंगात आहे.