आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL-7: कोलकताचा सनसनाटी विजय, दिल्लीचा घरच्या मैदानावर धोबीपछाड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- IPL-7 मध्ये कोलकता नाइट रायडर्सने दिल्ली डेअर डेव्हिल्सला त्यांच्या घरच्या मैदानावर हरवून आठ गडी राखून विजय मिळविला. कोलकताचा कर्णधार गौतम गंभीरने धमाकेदार अर्धशतकी खेळी केली. त्याव्यतिरिक्त रॉबिन उथप्पा याने शानदार 47 धावा केल्या. मनिष पांडे (23) आणि जॅक कॅलिस (10) नाबाद राहिले. फिरोज शहा कोटला मैदानावर हा सामना झाला.
रॉबिन उथप्पा आणि गौतम गंभीर यांनी पहिल्या विकेटसाठी 106 धावांची भागिदारी केली. त्यामुळे कोलकता सहजपणे सामना जिंकू शकला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करीत 5 गडी गमावून 160 धावांपर्य़ंत मजल मारली होती. त्याला उत्तर देताना कोलकताने 10 चेंडू शिल्लक असताना 8 गदी राखून विजय नोंदविला.
दिल्लीने दिले होते 161 धावांचे आव्हान
दिल्ली डेअर डेव्हिल्सने कोलकता नाइट रायडर्ससमोर 161 धावांचे आव्हान ठेवले होते. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 5 गडी गमावून 160 धावांपर्यंत मजल मारली होती. जीन पॉल ड्युमिनी 40 धावा आणि केदार जाधव 26 धावा करून नाबाद राहिले.
या सामन्याची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा..