आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Waveriders, Ranchi Rhinos Set Up Hockey India League

हॉकी इंडिया लीग : यूपी विझर्ड्स पराभूत; रांची रायनोज अंतिम फेरीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची - यजमान रांची रायनोजने शनिवारी हीरो हॉकी इंडिया लीगच्या अंतिम फेरीत धडक मारली. रांचीने उपांत्य लढतीत उत्तर प्रदेश विझर्ड्सचा 4-2 ने पराभव केला. रांचीकडून मनदीप सिंग व निक विल्सनने प्रत्येकी दोन गोल केले. यूपीकडून नितीन थिमैयाने दोन गोल केले.

मनदीपचा पहिला गोल
दोन्ही संघांनी सामन्यात दमदार सुरुवात केली. लढतीच्या चौथ्या मिनिटाला पहिला गोल करण्यात यजामानांना यश मिळाले. मनदीप सिंगने उत्तर प्रदेशच्या गोलरक्षकाच्या चुुकीचा फायदा घेतला. त्याने गोलचे खाते उघडून रांचीला 1-0 ने आघाडी मिळवून दिली. लढतीच्या 15 व्या मिनिटाला उत्तर प्रदेश विझर्ड्सने लढतीत 1-1 ने बरोबरी मिळवली. नितीन थिमैयाने यूपीकडून पहिला गोल केला.

विल्सनचा गोल; रांचीने घेतली महत्त्वाची आघाडी
निक निल्सनने 30 व्या मिनिटाला सुरेख गोल करून रांचीला 2-1 ने आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत यूपीला सामन्यात बरोबरी मिळवता आली नाही. दुस-या हाफमध्ये 54 व्या मिनिटाला नितीनने गोल करून यूपीला पुन्हा 2-2 अशी बरोबरी मिलवून दिली.

विल्सन, मनदीपचा धमाका
शेवटच्या सात मिनिटांपर्यंत सामना 2-2 ने बरोबरीत होता. अखेर, विल्सनने 63 व्या मिनिटाला गोल करून रांचीला 3-1 ने आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुस-या मिनिटात मनदीपने वैयक्तिक दुसरा व रांचीकडून चौथा गोल केला.