आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डेन्मार्कच्या रिकी पॅडरसनने जलतरणामध्‍ये नोंदवला नवा विश्वविक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बार्सिलोना - अमेरिकेचा स्टार खेळाडू रेयान लोश्चेने जागतिक जलतरण स्पर्धेच्या 200 मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये सुवर्णपदक जिंकले. यासह महिलांच्या गटातील 200 मीटर ब्रेस्ट स्ट्रोकच्या उपांत्य फेरीत डेन्मार्कच्या रिकी पॅडरसनने नवा विश्वविक्रम केला. तिने 2 मिनिट 19.11 सेकंदांत स्पर्धा जिंकून आपल्या नावे विक्रम नोंदवला. पॅडरसनने अमेरिकेच्या रेबेका सोनीच्या लंडन ऑलिम्पिकमधील 2 मिनिट 19.59 सेकंदांचा विक्रम मोडीत काढला. चीनच्या लियू जिगेने 04.59 सेकंदांत महिलांच्या 200 मीटर बटरफ्लॉयमध्ये सुवर्णपदक पटकावले. स्पेनच्या मिरिया बेलमोट गार्सियाने रौप्य आणि हंगेरीच्या कॅटिका होसजूने कांस्यपदक जिंकले. लियूच्या नावे या स्पर्धेत विश्वविक्रम आहे. दोन वर्षांपूर्वी शांघाय येथील स्पर्धेत तिने तिसरे स्थान गाठले होते.


रेयानने पुरुषांच्या 200 मीटरची स्पर्धा जिंकून सलग तिस-यांदा सुवर्णपदक आपल्या नावे केले. त्याने 1 मिनिट 54.98 सेकंदांत स्पर्धा जिंकली.
2 मिनिट 19.11
नवा विक्रम
2 मिनिट 19.59
रेबेका सोनीचा जुना विक्रम


13 सुवर्णसह चीन अव्वलस्थानी
स्पर्धेत चीनने 13 सुवर्ण, सात रौप्य आणि तीन कांस्यपदकासह अव्वल स्थान गाठले आहे. चीनची एकूण 23 पदके झाली आहेत. अमेरिका 23 पदकांसह दुस-या स्थानावर आहे. या संघाने 10 सुवर्णसह आठ रौप्य आणि पाच कांस्यपदके जिंकली. रशिया सात सुवर्ण, चार रौप्य आणि तीन कांस्यसह तिस-या स्थानावर आहे.