आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deposit Remaining Of BCCI To Other Countries Cricket Board

जगातील सर्वच क्रिकेट मंडळांकडे बीसीसीआयची थकबाकी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जगातील श्रीमंत क्रिकेट संघटना असा लौकिक असणार्‍या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आपली ती प्रतिमा जपताना जगातील जवळजवळ प्रत्येक क्रिकेट बोर्डाकडे असणारी येणी वसूल करण्याची तसदी घेतली नाही. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, पाकिस्तान, श्रीलंका या क्रिकेट बोर्डांपासून सिंगापूर, आयरिश क्रिकेट मंडळ अशा छोट्या क्रिकेट संघटनांनीही भारताची थकबाकी दिली नाही. ही थकीत रक्कम सुमारे 160 लाखांच्या घरात आहे.

एवढेच नव्हे तर शारजाच्या क्रिकेट बेनोव्हलेंट फंड सिरीजनेदेखील भारताचे सुमारे सव्वा लाख रुपये थकवले आहेत. शारजा येथील स्पर्धेतील भारताचा सहभाग बंद होऊनही सन 2000 पासूनची थकीत रक्कम वसूल करण्याची कुणीही तसदी घेतली नाही. झिम्बाब्वे क्रिकेट असोसिएशनकडून सन 2006 पासून थकलेले 1 लाख 78 हजार येणे आहे. सिंगापूर क्रिकेट असोसिएशनने सव्वा दोन लाख थकवले आहेत.

दक्षिण आफ्रिकेने तर चॅम्पियन्स लीग, आयपीएल आणि भारताच्या दौर्‍यांच्या अशा तीन वेगवेगळ्या स्पर्धांची थकवलेली देणी 80 लाखांच्या घरात जातात. इंग्लिश क्रिकेट बोर्डाची थकबाकी 23 लाखांच्या घरात जाते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून भारताला 15 लाखांचे येणे आहे. आयरिश क्रिकेट बोर्डाकडून बीसीसीआयला तब्बल 19 लाख रुपये येणे आहे. पाकिस्ताननेही भारताची दोन दौर्‍यांची मिळून 10 लाखांवर देणी थकवली आहेत. 2011 च्या विश्वचषकाचे संयुक्त आयोजक श्रीलंकेनेही भारताला 45 लाखांचा चुना लावला आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड वगळता अन्य सर्वच बोर्डांनी भारताची देणी परत करण्याचे सौजन्य दाखवले नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, गेल्या दशकापासूनची ही उधारी वसूल करण्यातही बीसीसीआयने फारसा रस दाखवलेला दिसत नाही.
थकीत रक्कम मिळवण्यासाठी यापुढेदेखील बीसीसीआय फारसे प्रयत्न करेल असे वाटत नाही. सध्यातरी इतरांसाठी मोठी असलेली ही रक्कम बीसीसीआयसाठी नगण्य ठरली आहे.


बीसीसीआयची उदासीनता
थकबाकी परत मिळावी यासाठी बीसीसीआयने किती प्रयत्न केले, हेदेखील अनुत्तरित आहे. 2007 मध्ये आयपीएलचे कुरण सापडल्यानंतर अशा छोट्या-मोठय़ा रकमांच्या थकबाकीची वसुली करण्यात बोर्डाने रस दाखवला नाही. थकीत रक्कम मिळवण्यासाठी यापुढेदेखील बीसीसीआय फारसे प्रयत्न करेल असे वाटत नाही. छोट्या क्रिकेट बोर्डाचा कारभार कित्येक वर्षे चालू शकेल, एवढी ही रक्कम बीसीसीआयसाठी आता नगण्य ठरली आहे. त्यामुळेच पैसे वसूल करण्याच्या बाबतीतली ही उदासीनता तर नाही ना?