आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Derbyshire Vs India At Derby Day 1, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'सर' जडेजाची कमाल, दुस-या सराव सामन्‍यात भारतीय गोलंदाजांची कामगिरी उंचावली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डर्बिशायर- इंग्लंडच्या दौ-यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाच्‍या दुस-या सराव सामन्‍यात 'सर' जडेजासह भारतीय गोलंदाजांनी चमकदार का‍मगिरी केली आहे. 9 जुलैपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी सिरीजला प्रारंभ होईल.
पहिल्‍या डाव अखेर डर्बीशायरने पाच विकेट गमावत 326 धावा बनविल्‍या होत्‍या. डर्बीकडून डुरस्टोनने 95, गोडलमॅन ने 67 आणि स्लेटर ने 54 धावांची पारी खेळली.
जडेजाने घेतल्‍या दोन विकेट
भारता‍कडून रवीद्र जडेजाने दोन विकेट मिळविल्‍या. तर पंकज सिंह, इश्‍वर पांडे अ‍ाणि स्‍टुअर्ट बिन्‍नी यांना प्रत्‍येकी 1-1 विकेट घेतल्‍या. पंकज सिंहने पॉल बोरिंगटन (0) वर विकेट घेतली. लेफ्ट आर्म स्पिनर रवीन्द्र जडेजाने कर्णधार चेस्नी ह्यूज (23) आणि सलामीवीर बेन स्लेटर (54) यांना बाद केले. वेगवान गोलदंजा ईश्वर पांडेने एलेक्स ह्यूज (एक) ला बाद केले.

(फोटोओळ- विकेट मिळविल्‍यानंतर आनंदी मुद्रेत रवीद्र जडेजा)