आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेव्हिस चषक: भारतीय संघाची 3-0 ने विजयी आघाडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - यजमान भारतीय संघाने घरच्या मैदानावर चमकदार कामगिरी करताना शनिवारी आशिया ओसिसुना गु्रप-1 डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत चीन तैपेईविरुद्ध 3-0 ने विजयी आघाडी घेतली. युवा खेळाडू युकी भांबरीपाठोपाठ सोमदेव देववर्मन आणि रोहन बोपन्ना-साकेत मेनेनीने सामने जिंकून यजमानांची आघाडी निश्चित केली. चीन तैपेईच्या नंबर वन सुंगपाठोपाठ टी. चेनलाही पराभवाचा सामना करावा लागला. आता रविवारी पुरुष एकेरीचे दोन सामने होतील.
सोमदेवचा शानदार विजय : शुक्रवारी अंधूक प्रकाशामुळे सोमदेव आणि टी. चेन यांच्यातील मॅरेथॉन लढत थांबवण्यात आली होती. दुस-या दिवशी शनिवारी भारताचा नंबर वन सोमदेवने अवघ्या आठ मिनिटांत चेनला धूळ चारून भारताची आघाडी निश्चित केली. त्याने 6-7, 7-6, 1-6, 6-2, 9-7 अशा फरकाने सामना जिंकला. त्याने चार तास 40 मिनिटे रंगलेल्या लढतीत बाजी मारली. सोमदेवचा चेनविरुद्ध हा तिसरा विजय आहे. यापूर्वी त्याने 2009 आणि 2010 मध्ये आशिया चषकात चेनला पराभूत केले होते.
रोहन बोपन्ना आणि साकेत मेनेनी विजयी
दुसरीकडे पुरुष दुहेरीत तैपेईच्या सियेन यिन पेंग आणि सुंग हुआ यांगला पराभवाचा सामना करावा लागला. भारताच्या रोहन बोपन्ना आणि साकेत मेनेनीने या जोडीला पराभूत केले. यजमानांच्या जोडीने 6-0, 6-7, 6-3, 7-6 ने सामना जिंकला. दुस-या सेटमध्ये तैपेईच्या जोडीने पुनरागमन केले. मात्र, त्यानंतर या जोडीचा तिस-या व चौथ्या सेटमध्ये त्याचा फार काळ निभाव लागला नाही.