आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhanraj Pillai Wants To Be Coach Of Indian Hockey Team

मला प्रशिक्षक बनवा, एका वर्षात रिझल्ट बघा- धनराज पिल्ले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षकपद देऊन बघा, सोबत थोडीशी मोकळीकही द्या आणि एका वर्षात रिझल्ट बघा... माजी कर्णधार धनराज पिल्लेने असे थेट आव्हान हॉकी इंडियाला दिले आहे. हॉकी संघाचे प्रशिक्षकपद मिळावे ही मनीषा त्यांनी सोमवारी जाहीर बोलून दाखवली. परदेशी प्रशिक्षक नेमणे त्यांना मंजूर नाही. या मंडळींवर आपण आतापर्यंत बराच पैसा उधळला, अशी टीका त्याने केली. भारतात गुणी, चांगल्या प्रशिक्षकांची अजिबात वानवा नाही.
मग विदेशी कोचच का, असा सवालही त्याने उपस्थित केला आहे.

भारतीय हॉकी संघाच्या सुमार कामगिरीमुळे प्रशिक्षक मिशेल नॉब्ज यांना नुकताच नारळ देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर पिल्ले यांनी हे मत मांडल्यामुळे एका नव्या विषयाला तोंड फुटले आहे.

भारतीय हॉकीला विदेशी प्रशिक्षकाची अजिबात गरज नाही. आतापर्यंत अशा प्रशिक्षकांवर आपण खूप पैसा खर्च केला. गेरहार्ड राक्च (2004) यांच्यापासून ते आता-आताच्या मिशेल नॉब्ज (2012 लंडन ऑलिम्पिक) असे अनेक प्रशिक्षक नेमले. पण हाती काहीच लागले नाही. उलट भारतीय हॉकी खूप मागे गेली. आता विश्वचषक स्पर्धेसाठीही संघर्ष करायची वेळ आपल्यावर येऊन ठेपलीय, असे धनराजने यावेळी नमूद केले.

भारतात एकापेक्षा एक प्रशिक्षक आहेत. मला एक संधी द्यावी. थोडीशी मोकळीक मिळाली, तर एका वर्षात चांगला रिझल्ट देईन, असा विश्वासही यावेळी त्याने व्यक्त केला. भूतकाळातही अनेकदा भारतीय हॉकी संघाने दमदार कामगिरी केली त्या वेळी प्रशिक्षक भारतीयच होते. मग आपल्याला एक संधी का दिली जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. भारतीय संघाच्या गचाळ कामगिरीमुळे नॉब्ज यांच्या गच्छंती आली आहे, असेही यावेळी त्याने नमूद केले.

एअर इंडियाला मागदर्शन
धनराज पिल्ले सध्या एअर इंडियाच्या संघाचा प्रशिक्षक आहेत. त्याच्या मार्गदर्शनाखाली एअर इंडियाने चांगली कामगिरी केली आहे. असे असताना मायकेल नोब्स यांच्या गच्छंतीनंतर हॉकी इंडियाने परदेशी प्रशिक्षक नेमण्याचेच संकेत दिले आहेत.