आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत ‘अ’ संघात मुंबईचा धवल कुलकर्णी !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विंडीजविरुद्ध २ सराव सामने खेळण्यासाठी सीनियर निवड समितीने आज चेन्नई येथे भारत अ संघाची निवड केली. मनोज तिवारीकडे या संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. मुंबईचा धवल कुलकर्णी हा एकमेव खेळाडू या संघात आहे. केदार जाधवचा संघात समावेश आहे. पहिला सराव सामना ब्रेबॉर्नवर होईल.

भारत ‘अ’ संघ : मनोज तिवारी (कर्णधार), उन्मुख चंद, मुरली विजय, करुण नायर, केदार जाधव, संजू सॅमसन, स्टुअर्ट बिन्नी, परवेझ रसूल, अमित मिश्रा, जसप्रीत भुमरा, धवल कुलकर्णी, राहुल शुक्ला, करण शर्मा, गुरुप्रीतसिंग मान.