आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhawan Mocks Watson In Bangalore ODI India Vs Australia

धवन-रैनाने छेडले वॉटसनला, शिवी देणा-या जडेजाला दंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेंगळुरू- ऑस्‍ट्रेलियाला अंतिम वनडेमध्‍ये 57 धावांनी पराभूत करून टीम इंडियाने नवीन इतिहास रचला आहे. 1987नंतर पहिल्‍यांदाच ऑस्‍ट्रेलियाविरूद्धची वनडे मालिका (5पेक्षा जास्‍त सामने) जिंकण्‍याचा कारनामा टीम इंडियाने केला आहे. रोहित शर्माच्‍या ऐतिहासिक द्विशतकाने हे अशक्‍यप्राय कामगिरी केली. पण त्‍याच्‍या सहकारी खेळाडूंच्‍या एका चुकीमुळे मात्र मान खाली घालावी लागली आहे.

वॉटसनशी अरेरावी; जडेजाला दंड
दुबई- भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला शनिवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सातव्या वनडेतील गैरवर्तन प्रकरणी कारवाईला सामोरे जावे लागले. त्याने या सामन्यात शेन वॉटसनला असभ्य भाषेत शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी आयसीसीने जडेजाला सामना निधीच्या 10 टक्के रकमेचा दंड ठोकला आहे.

काय होता हा संपूर्ण प्रकार... वाचा पुढील स्‍लाईड्समध्‍ये..