आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉर्पोरेट ट्रॉफीसाठी धोनी, अश्विनची निवड

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांपेक्षा आयपीएल, कॉर्पोरेट क्रिकेट आणि परदेशी संघांबरोबरच्या क्रिकेटला प्राधान्य देण्याचा धोरणाचा पाठपुरावा बीसीसीआयने अजूनही सोडला नाही. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे, इराणी करंडक स्पर्धेसाठी शेष भारत संघात निवड न झालेल्या महेंद्रसिंग धोनी, चेतेश्वर पुजारा व आर. अश्विन या 3 खेळाडूंचा कॉर्पोरेट ट्रॉफीसाठी जाहीर झालेल्या संघात समावेश करण्यात आला आहे. रणजी स्पर्धेचे महत्त्व कमी करणा-या बीसीसीआयने आपल्या आणखी एका पारंपरिक क्रिकेट स्पर्धेचा गळा घोटला आहे.

इराणी करंडक सामना हंगामाच्या प्रारंभी आयोजित करून त्याद्वारे भारतीय संघासाठी योग्य खेळाडूंची चाचपणी होत होती. ऑस्ट्रेलिया संघाच्या भारतातील कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर इराणी करंडक सामन्याला अधिक महत्त्व देणे गरजेचे होते. त्याऐवजी एन. श्रीनिवासन या बीसीसीआय अध्यक्षांच्या इंडिया सिमेंट कंपनीच्या संघात धोनी व अश्विन यांचा समावेश करण्यात आला आहे.