आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dhoni Become Brand Ambecedor To English Football

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेटपटू धोनी झाला इंग्लिश फुटबॉलचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेणारा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आता चक्क फुटबॉलकडे वळला आहे. अर्थात माहीने क्रिकेट सोडले नसून तो इंग्लिश प्रीमियर फुटबॉल लीगचा (ईपीएल) प्रचार करणार आहे.
माहीचे फुटबॉलप्रेम सर्वश्रुत आहे. या निमित्ताने आपल्या क्रीडाप्रेमाला नवा आयाम देण्याची संधी त्याला मिळाली आहे. ईपीएलचे सामने पाहण्याचे आवाहन धोनी प्रेक्षकांना करणार आहे. त्याच्या मानधनापोटी धोनीला सुमारे 10 कोटी रुपयांची घसघशीत कमाई होणार आहे. आजघडीला त्याच्याकडे 15 जाहिराती आहेत. प्रत्येक जाहिरात माहीच्या खात्यात 10 कोटी रुपयांची भर घालते.


धोनी म्हणाला, मी ब्रिटिश प्रीमियर लीगचा मोठा चाहता आहे. जेव्हा क्रिकेट खेळत नसतो तेव्हा वीकेंडला बीपीएल बघतोच बघतो. फुटबॉल हा अत्यंत रोमांचक खेळ आहे. शाळेच्या दिवसांत मी स्वत: गोलकीपर होतो. आजही मी क्रिकेटचा सराव म्हणून फुटबॉल खेळत असतो.


धोनी ईपीएल ब्रँड अ‍ॅम्बेसेडर
स्टार स्पोर्ट्सने धोनीची जगातील सर्वात मोठ्या बार्कलेज इंग्लिश प्रीमियर लीगच्या (ईपीएल) ब्रँड अ‍ॅम्बेसेडरपदी निवड केली आहे. 2013-14 चा हंगाम 17 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ईएसपीएन सॉफ्टवेअर इंडियाचे सीओओ विजय राजपूत यांनी सांगितले की, धोनीच्या माध्यमातून ईपीएलची लोकप्रियता वाढवली जाईल.


हिंदीत धावते समालोचन
स्टार स्पोर्ट्सने ईपीएलच्या निवडक 100 सामन्यांचे धावते समालोचन हिंदीतून करण्याचे ठरवले आहे. लोकांना र्ईपीएलकडे आकर्षित करायचे असेल तर त्यांना सोप्या वाटणा-या भाषेतच समालोचन असावे, असे राजपूत यांनी सांगितले. सुरुवातीला दर आठवड्यात दोन सामन्यांचे समालोचन हिंदी आणि इंग्रजीतून केले जाणार आहे.
अशी असेल जाहिरात : धोनी कुठे गायब झालाय...मित्र, कुटुंबीय सारेच त्याला शोधत आहेत. अन् तो बसलाय टीव्हीसमोर... फुटबॉल बघत...ईपीएलची ही जाहिरात लवकरच सादर होईल. आठवड्याच्या शेवटी न चुकता ईपीएल पाहण्यासाठी धोनी टीव्हीसमोरून हलत नाही, अशी ही जाहिरात आहे.