आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhoni Becomes Most Successful Indian Captain In Test Cricket

ऑस्‍ट्रेलियाला नमवून धोनी ठरला भारताचा सर्वाधिक यशस्‍वी कसोटी कर्णधार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद- हैदराबाद कसोटीत धोनीच्‍या धुरंधरांनी चौथ्‍या दिवशीच कांगारुंचे काम तमाम करुन टाकले. टीम इंडियाने ऑस्‍ट्रेलियाचा 1 डाव आणि 135 धावांनी मोठा विजय नोंदविला. हा विजय ऑस्‍ट्रेलियाविरुद्ध दुसरा मोठा विजय ठरला. तर या विजयासह धोनी भारतीय कसोटी इतिहासातील सर्वात यशस्‍वी कर्णधार बनला.

चेतेश्‍वर पुजारा या सामन्‍यात सामनावी ठरला. त्‍याने ठोकलेले द्विशतक आणि मुरली विजयसोबत (167) केलेल्‍या 370 धावांच्‍या भागीदारीमुळे भारताला मोठी धावसंख्‍या उभारता आली. भारताने 1998 मध्‍ये ऑस्‍ट्रेलियाला कोलकाता कसोटीत 1 डाव आणि 219 धावांनी पराभूत केले होते. त्‍यानंतरचा हा दुसरा मोठा विजय ठरला. तेव्‍हापासून भारताने ऑस्‍ट्रेलियाला डाव राखून पराभूत केले नव्‍हते.

या विजयासह धोनीने सौरव गांगुलीचा विक्रम मोडला आहे. सौरव गांगुलीने कर्णधार म्‍हणून भारताला 21 कसोटी सामन्‍यांमध्‍ये विजय मिळवून दिला होता. त्‍याचा विक्रम धोनीने मोडला. धोनीने हैदराबाद येथील विजयासह तब्‍बल 22 कसोटी जिंकल्‍या आहेत. त्‍यामुळे धोनी कसोटी सामन्‍यांमध्‍ये भारताचा सर्वात यशस्‍वी कर्णधार ठरला आहे.

हैदराबाद कसोटीतील पराभव ऑस्‍ट्रेलियाचा 14 वा मोठा पराभव ठरला. गेल्‍या वर्षी भारताचा 4-0 असा पराभव करणारा ऑस्‍ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्‍लार्क हिरो ठरला होता. परंतु, भारत दौ-यात त्‍याचा संघ अपयशी ठरत आहे. क्‍लार्क चांगल्‍या फॉर्मात आहे. पण, इतर खेळाडू सपशेल अपयशी ठरत आहेत. हैदराबादला तर चौथ्‍या दिवशी उपहाराच्‍या आतच ऑस्‍ट्रेलियाचा संघ गारद झाला. त्‍यांचे फलंदाज अपयशी ठरले. तर गोलंदाजही पार निष्‍प्रभ ठरले. चुकीची संघ निवड हे यामा‍गील एक मोठे कारण मानले जात आहे. नॅथन लियॉनऐवजी झेव्हियर डोहर्तीला घेण्‍याच्‍या निर्णयावर कडाडून टीका होत आहे.