आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनी ब्रिगेडच्या चांगल्या कामगिरीने चित्र पालटेल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेट नियामक मंडळात तिस-या स्थानावर असलेले सचिव संजय जगदाळे आणि खजिनदार अजय शिर्के यांनी शुक्रवारी राजीनामा दिला. रविवारी बीसीसीआयच्या कार्यकारी समितीची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत सर्व चित्र स्पष्ट होईल. तसे पाहिले तर बीसीसीआयमधील राजीनाम्याचे सत्र हे आजाराच्या निदानासारखे नाही, तर आजाराची गंभीरता ओळखण्याचा हा प्रयत्न आहे. स्पॉट फिक्सिंगमध्ये रोज नवनवे खुलासे होत आहेत. या फिक्सिंगमुळे नाराज असलेले चाहते अधिकच प्रतिक्रिया देत आहेत. आपल्याला न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवून प्रतीक्षा करावी लागेल. दोषी कोण, हे न्यायालयात सिद्ध होणार आहे. आपल्या संतप्त भावनामुळे काहीही होणार नाही. जोपर्यंत कोणताही निर्णय येत नाही तोपर्यंत भारतीय खेळाडूंनी क्रिकेटच्या पुनर्स्थापनेसाठी खेळावर अधिक लक्ष केंद्रित करायला हवे. संघाच्या विजयाने चाहते आणि प्रायोजक अधिक खुश होतील. यामुळे क्रिकेटचे चाहते आणि राजकीय नेते काय करत आहेत याला महत्त्व राहणार नाही.


फिक्सिंगमधील तीन आरोपींमुळे क्रिकेटचे वातावरण अधिक गढूळ झाले आहे. चाहते आणि प्रायोजकांचा विश्वास संपादन करण्यास आता अधिक वेळ लागेल. मात्र, धोनी ब्रिगेडने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली तर कमीत कमी चाहत्यांच्या मनात खेळाडूंविषयीचा आदर पुन्हा निर्माण होईल. मागे झालेल्या घटनेचा परिणाम खेळाडूंवर पडू नये आणि त्यांनी केवळ आपल्या खेळाकडे अधिक लक्ष देणे अधिक महत्त्वाचे राहील, असे सांगण्याचे तात्पर्य आहे.


2000 मध्ये पहिल्यांदा स्पॉट फिक्सिंगचे प्रकरण उघडकीस आले. तेव्हा क्रिकेट रसातळाला जाईल असे वाटत होते. मात्र, त्याच्या उलट घडले. कारण राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, महेंद्रसिंग धोनी आणि जहीर खानने चांगली कामगिरी करून भारतीय क्रिकेटला यशोशिखरावर नेऊन पोहोचवले. फिक्सिंगच्या घटनेनंतर खेळाडू मन लावून खेळतात. फिक्सिंग झाल्यास चौकशी होईलच. खेळाडूंनी सर्व काही सत्य सांगून चौकशी करणा-यास मदत करावी. क्रिकेट मंडळासोबतच्या विचारविनिमयातून आजारावर निदान करणे शक्य आहे. कोणतीही भीती न बाळगता खेळाडूंनी आपले म्हणणे स्पष्ट करायला हवे. यामधून चाहत्यांना सकारात्मक संकेत मिळतात.


काही अपवाद सोडले तर काही वर्षांपासून बीसीसीआयने खेळाडूंच्या हितासाठी अनेक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. खेळाडूंना चांगले वेतन दिले जाते. त्यांच्या विकासात्मक गोष्टींवरही लक्ष दिले जाते. खेळाडूंनीही योग्य वेळी आवाज उठवला पाहिजे. जगातील प्रत्येक मोठ्या खेळातील खेळाडू असेच करतात. असे केल्याने खेळालाही संरक्षण मिळते. तसेच खेळामधील गैरप्रकाराचे वातावरणही नष्ट होते.


मी धोनी, द्रविड, सचिनला सल्ला देऊ इच्छितो की, त्यांनी देशातील युवा खेळाडूंकडे जावे. काय बरोबर आणि काय चुकीचे हे त्यांना समजावून सांगावे. तसेच सांगावे की, मेहनत केल्यास क्रिकेटमध्ये अर्थार्जनही चांगले होते. क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात व्यावसायीकरण झाले आहे. खेळल्याने आर्थिक उत्पन्नात वाढ होऊ शकते. त्यासाठी वाईट मार्गांचा अंबलव करण्याची गरज नाही. आशा आहे की, ते असे करतील.