आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेथ ओव्हरमध्ये धोनी डेंजर : अ‍ॅलेस्टर कुक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोची- डेथ ओव्हरमध्ये भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी सर्वाधिक आक्रमक फलंदाजी करतो, असे मत इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलेस्टर कुकने व्यक्त केले आहे. मालिकेतील दुस-या सामन्‍यात टीम इंडियाकडून पराभूत झाल्‍यानंतर कुकने पत्रकारांशी संवाद साधला.

डेथ ओव्हरमध्ये फलंदाजी करण्यासाठी तो जगात सर्वोत्तम आहे. धोनीने आपल्या एकापाठोपाठ एक प्रदर्शनाने हे सिद्ध केले आहे. अशा सपाट खेळपट्टय़ांवर त्याला रोखणे खूप कठीण असते, असे तो म्हणाला.

धोनीने 66 चेंडूत सात चौकार आणि दोन षटकारांच्‍या मदतीने 72 धावा केल्‍या होत्‍या. त्‍याने स्‍लॉग ओव्‍हरमध्‍ये रवींद्र जडेजाच्‍या मदतीने इंग्‍लंडच्‍या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले होते. त्‍याच्‍या खेळीमुळेच टीम इंडियाला 285 धावसंख्‍येपर्यंत मजल मारता आली होती. या सामन्‍यात इंग्‍लंड संघाचा 127 धावांनी पराभव झाला होता.