आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhoni Defends Flop Yuvraj Singh Latest News In Marathi

सर रवींद्र जडेजाचा टिवटिवाट: 'फ्लॉप युवराज बाद होणे हा सामन्‍याचा टर्निंग पॉइंट'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मीरपूर- 'वेस्‍ट इंडीज विरुध्‍द खेळल्‍या गेलेल्‍या सामन्‍यामध्‍ये शेवटच्‍या षटकात युवराज सिंह बाद होणे हा सामन्‍याचा टर्निंग पॉइंट होता. अन्‍यथा सामना अनिर्णित राहिला असता' असे ट्विट करुन रवींद्र जडेजाने युवराजची एकप्रकारे खिल्‍ली उडविली आहे.
ट्विटर वर 'Sir Ravindra Jadeja' या नावाने रवींद्र जडेजाचे अकाऊंट आहे. भारतीय संघाच्‍या खेळाडूंच्‍या का‍मगिरीवर कटाक्ष टाकताना जडेजा काही ट्विट करतो. त्‍याचे फॉलोअर्स मोठ्याप्रमाणावर ती पोस्‍ट बघतात, शेअर करतात.

...धोनीचा वरदहस्‍त
युवी फ्लॉफ ठरत असताना अंतीम अकरामधून त्‍याला बाहेर काढण्‍याची चर्चा सुरु आहे. मात्र धोनीच्‍या वरदहस्‍ताने त्‍याला अंतीम अकरामध्‍ये स्‍थान देण्‍यात आहे. युवराज चांगले प्रदर्शन करेल यावर धोनीचा आजही विश्‍वास आहे.

प्रसिध्‍दी माध्‍यमांशी बोलताना धोनी म्‍हणाला, की '' युवराज ट्वेंटी-20 क्रिकेट मधील सर्वश्रेष्‍ठ खेळाडू आहे. एकदिसीय क्रिकेटप्रकारात बाहेर असल्‍याने त्‍याला लयीत यायला थोडा वेळ लागणार आहे. संघामध्‍ये कोणताही खेळाडू पूनरागमन करतो त्‍यावेळी त्‍याच्‍यावर दबाव असतो.''

पुढील स्‍लाइडवर क्लिक करा अ‍ाणि वाचा एका धावेसाठी अडखळणार युवराजसिंह