आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनी प्राप्तिकर विभागाच्या चौकशीच्या फेर्‍यात, 75 कोटींच्या चार चेकचे गौडबंगाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आयपीएल सट्टेबाजी आणि स्पॉट फिक्सिंगमधील आरोपांनी त्रस्त टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर आता आणखी एक संकट आले आहे. एका इंग्रजी दैनिकातील वृत्तानुसार, प्राप्तिकर विभाग धोनीला मिळालेल्या 75 कोटी रुपयांच्या चेकची चौकशी करीत आहे. 2011-12 या आर्थिक वर्षात आम्रपाली ग्रुपचे अध्यक्ष अनिल शर्मा यांनी धोनीच्या नावे 75 कोटींचे चार चेक दिले होते. 2014 मध्ये हे चेक कॅश केले जाणार आहे. या चार चेकची चौकशी प्राप्तीकर विभागाची रांची टीम करीत आहे.

धोनी आम्रपाली ग्रुपचा ब्रँड अँबेसिडर आहे तर, त्याची पत्नी साक्षी आम्रपाली माही डेव्हलपर्समध्ये 25 टक्के भागीदार आहे. आम्रपाली माही डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि आम्रपाली ग्रुप हा धोनीचा संयुक्त उपक्रम आहे. प्राप्तीकर विभागाने या दोन्ही कंपन्यांशी संबंधीत कागदपत्रे मागितली आहेत. या कंपन्यांशी संबंधीत वृत्त प्रकाशित झाल्यानंतर प्राप्तीकर विभागाने चौकशी सुरु केली आहे. प्राप्तीकर विभागाने आम्रपालीच्या दिल्ली आणि उत्तरप्रदेश येथील कार्यालयांवरही छापेमारी केली आहे.