आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: पाहा बाइकवेडा धोनी, एफ-1 सर्किटवर केली बाइकसवारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फेस्टिव्‍हल दरम्‍यान बाइकला पाहताना धोनी)

ग्रेटर नोएडा - बाइक आणि रेसिंगबद्दलचे धोनीचे प्रेम सर्वश्रुत आहे. भारतीय क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनी ने फॉर्मूला वन बुद्ध इंटरनेशनल सर्किटवर त्‍याने बाइकवरुन फेरी मारली. निमित्‍त होते बाइक फेस्टिवल ऑफ इंडिया (बीएफआई) चे. उल्‍लेखनिय म्‍हणजे या बाइक फेस्टिव्‍हलचा ब्रँड अँबेसेडर धोनी आहे.
रेस पाहण्‍यासाठी जमली गर्दी
धोनीला रेसरच्‍या रूपात पाहण्‍यासाठी धोनीप्रेमींनी मोठ्याप्रमाणावर गर्दी केली होती. धोनींच्‍या चाहत्‍यांना रोखण्‍यासाठी मोठ्या प्रमाणावर सुरक्षारक्षक तैणात केले होते. रेसिंग शौकीन धोनीने बुद्ध सर्किटवर यापूर्वीही बाइ्रक चालविल्‍या आहेत.
धोनी-धोनी..चा गजर
धोनीने एफ-वन ट्रॅकवर बाइक चालवतेवेळी धोनी प्रशंसक धोनी-धोनी नावाच्‍या घोषणा देत होते. धोनी एफ-वन सर्किटवर अगदी राजाच्‍या थाटात वावरत होता.
सोशल साइटवर पोस्ट केली छायाचित्रे
महेंद्र सिंह धोनी ने सोशल साइट इंस्टाग्रामवर फेस्टिव्‍हल दरम्‍यानची छायाचित्रे पोस्‍ट केली. ज्‍यामध्‍ये धोनी क्रूजर आणि स्पोर्ट्स बाइक वरुन सवारी करताना दिसत आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, धोनीचे बाइकवेड...