आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनीवर एका सामन्‍याची बंदी, एडीलेडमध्‍ये सेहवाग करणार नेतृत्त्व

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्थः ऑस्‍ट्रेलियातील मालिकेत भारतीय संघाची दारुण अवस्‍था झालेली असतानाच आणखी एक धक्‍का बसला आहे. कर्णधार महेंद्र सिंग धोनीवर एका सामन्‍याची बंदी घालण्‍यात आली आहे. तो अॅडीलेड कसोटीत खेळू शकणार नाही. अॅडीलेड येथे 24 जानेवारीपासून मालिकेतील अखेरचा सामना सुरु होणार आहे. धोनीच्‍या अनुपस्‍ि‍थतीत सेहवाग या कसोटीमध्‍ये संघाचे नेतृत्त्वाची जबाबदारी राहणार आहे.
पर्थ कसोटीत भारताचा दारुण पराभव झाला. त्‍यात 4 वेगवान गोलंदाज खेळविण्‍याचा निर्णय धोनीच्‍या चांगलाच अंगलट आला आहे. चार वेगवान गोलंदाज खे‍ळविल्‍यामुळे भारताला षटकांची गती राखणे शक्‍य झाले नाही. त्‍यामुळे धोनीवर सामनाधिका-यांनी कारवाई केली. यापुर्वी 1991मध्‍ये सिडनी कसोटीत भारताने 4 वेगवान गोलंदाज खेळविण्‍याचा निर्णय घेतला होता. त्‍यावेळी मोहम्‍मद अझहरुद्दीन कर्णधार होता.
वरिष्‍ठांबद्दलचा निर्णय अतिशय काळजीपूर्वक घ्‍यायला हवाः धोनी
'वाका'वर भारताचा डावाने लाजीरवाणा पराभव, कांगारुंनी मालिका जिंकली