आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कमाईत धोनी नं 1 तर, सचिन नं 2

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीने कमाईच्या बाबतीत मास्टर ब्लास्टर सचिनलाही मागे टाकले आहे. फोर्ब्स मासिकाने सगळ्यात जास्त कमाई करणार्‍या क्रिकेट खेळाडूंची नावे जाहीर केली आहे.
जगभरातील सर्वात जास्त कमाई करणार्‍या खेळाडूंच्या यादीत 10 पैकी 6 खेळाडू भारतीय आहेत. फोर्ब्सच्या ताज्या यादीनुसार धोनी पहिल्या नंबरला तर मास्टर ब्लास्टर दुरर्‍या क्रमांकावर आहे.
धोनीची एकूण कमाई 26.5 मिलियन डॉलर (19 कोटी 47 लाख रूपये) आहे. 23 मिलियन डॉलर हे जाहिरातींच्या माध्यमातून मिळविलेले आहे. 3.5 मिलियन डॉलरची रक्कम ही क्रिकेट खेळून मिळविले आहे.
दुरर्‍या क्रमांकावर असलेल्या सचिनने 18.6 मिलियन डॉलर म्हणजेच 103 डॉलरची कमाई केली आहे. 16.5 मिलियन डॉलर (92 कोटी रूपये ) हे जाहिरीतींच्या माध्यमातून कमावण्यात आले आहेत. उर्वरीत 2.1 (11 कोटी 68 लाख) रूपयांची रक्कम ही क्रिकेट खेळून कमाविण्यात आली आहे.
बाकी खेळाडूंमध्ये गौतम गंभीर 7.3 मिलियन डॉलर , विराट कोहली 7.1 मिलियन डॉलर, वीरेंद्र सहवाग 6.9 मिलियन डॉलर, शेन वॉटसन 5.9 मिलियन डॉलर, माइकल क्‍लार्क 4.9 मिलियन डॉलर, ब्रेट ली 4.8 मिलियन डॉलर, रिकी पोंटिंग 4.1 मिलियन डॉलर आणि यूसुफ पठान 3.7 मिलियन डॉलर
सचिन आणखी 5-6 वर्षे क्रिकेट खेळणार, इतक्‍यात निवृत्तीचा विचार नाही