आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोनीच्या बाउन्सरवर धोनीला दुखापत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहाली - कर्णधार धोनीच्या अंगठ्याला लागलेली दुखापतीची साडेसाती काही केल्या सुटेनाशी झाली आहे. रांचीपाठोपाठ मोहालीतही सरावादरम्यान धोनीचा अंगठा दुखावला गेला आहे. त्याने पीसीए मोहालीत मनप्रीतसिंग गोनीच्या चेंडूवर फलंदाजीचा सराव केला. या वेळी गोनीने टाकलेल्या बाउन्सरवर धोनीला फटका मारता आला नाही. यामुळे सरळ चेंडू त्याच्या अंगठ्यावर लागला. याचा धोनीला चांगलाच त्रास जाणवला. या दुखापतीमुळे त्याने दोन्ही हात झटकण्यास सुरुवात केली. फिजिओ इवान स्पिचलीने धोनीच्या अंगठ्याची तपासणी केली.
युवीला ताप
टीम इंडियाच्या सरावादरम्यान युवराज सिंग अनुपस्थित होता. सोमवारी रात्री तापाने फणफणलेल्या युवीला गळ्याचा त्रास सुरू झाला. त्याने पूर्ण दिवस हॉटेलात घालवला. तापातून पूर्णपणे बरा होण्यासाठी त्याला विश्रांती देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. युवी अनफिट असल्यास त्याच्या जागी रोहित शर्मा किंवा चेतेश्वर पुजाराला संधी दिली जाऊ शकते.
परवेझ रसूलची धोनीसाठी गोलंदाजी
काश्मीरच्या परवेझ रसूलने सरावादरम्यान कर्णधार धोनी, गौतम गंभीरसाठी गोलंदाजी केली. तसेच त्याच्यासोबत काही रणजीपटूदेखील मैदानावर उपस्थित होते. या सर्वांनी टीम इंडियासाठी गोलंदाजी केली.
...तरीही फिट
अंगठ्याला झालेली दुखापत गंभीर नसल्याने धोनी चौथ्या वनडेमध्ये खेळणार आहे, अशी माहिती टीमच्या व्यवस्थापकांनी दिली. रांची येथे सराव करताना झालेल्या जखमेवरच पुन्हा एकदा गोनीचा बाउन्सर लागला आहे. या त्रासातून सावरण्यासाठी त्याला तब्बल 10 मिनिटे लागली.